उद्यापासून सर्व मोबाईलवर सुरू होणार सीएनएपी सेवा! अनोळखी कॉल येताच स्क्रीनवर झळकणार कॉलरचे खरे नाव

Foto
भारतात उद्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबर रोजीकॉलर नेम प्रेझेंटेशन ही नवी सेवा देशभरात लागू होत आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने यासंदर्भात नुकतीच नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नियमांनुसार, आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना स्मार्टफोन वापरकर्त्यांना अनोळखी कॉलरचे अधिकृत नाव थेट मोबाईल स्क्रीनवर दाखवणे बंधनकारक असणार आहे. यामुळे कोणतीही थर्ड-पार्टी अ‍ॅप्स न वापरता, सिम कार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे तिचे खरे नाव कॉल येताच नागरिकांना स्पष्ट दिसणार आहे. सीएनएपी सेवेअंतर्गत, ४जी आणि ५ जी सेवा वापरणार्‍या वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर अज्ञात क्रमांकाचे नाव देखील दिसेल.
ही सेवा काही प्रमाणात ट्रू-कॉलर अ‍ॅपची आठवण करून देते. उदाहरणार्थ, जेव्हा व्यक्ती अ व्यक्ती ब ला कॉल करते, तेव्हा जर व्यक्ती अ च्या संपर्क पुस्तिकेत व्यक्ती ब चे नाव समाविष्ट असेल, तर फोनवर ते नाव दिसेल. आणि जर एखाद्या व्यक्तीचे नाव कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह केलेले नसेल, तर मोबाईल नंबरच्या खाली कॉलरचे खरे नाव दिसेल. अज्ञात कॉलरचे नाव सिम कार्ड धारकाच्या नावासारखेच असेल.

आंतरराष्ट्रीय कॉलची माहिती मिळणार
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, सीएनएपी फोनवर अज्ञात कॉलरचे नाव दाखवते. जर तो आंतरराष्ट्रीय कॉल असेल, तर आंतरराष्ट्रीय कॉल असे दिसेल.
४जी आणि ५जी साठी सेवा सुरू
 सीएनएपी ची सेवा सध्या ४जी आणि ५जी मोबाईल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. २ आणि ३ ग्राहकांसाठी येत्या काही दिवसांत स्वतंत्रपणे सेवा सुरू केली जाईल.
सायबर गुन्हेगारांचे विदेशात जाळे
सीएनएपीमुळे भारतीय वापरकर्त्यांना त्यांचा कॉलर भारतातील आहे की परदेशी, हे सहजपणे ठरवता येईल. सायबर गुन्हेगार अनेकदा परदेशातून कॉल करून लोकांना लक्ष्य करतात. अनेक सायबर गुन्हेगारी टोळ्यांचे परदेशात संबंध असतात.
सीएनएपीच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्याचे दूरसंचार विभागाचे  उद्दिष्ट आहे. दरवर्षी भारतातील लाखो लोक सायबर गुन्हेगारीमुळे आपली बँक खाती गमावतात.